शहरामध्ये पावसाचा तुरळक वर्षाव

कामशेत;शहरामध्ये सोमवारी (दि.२२) संध्याकाळी पावसाचा तुरळक वर्षाव झाला. टप्याटप्याने विविध उपनगरांमध्ये सरी बरसल्या. यामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

कामशेत शहर व उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत होते. शहरामध्ये ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत होता. दुपारनंतर उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. नाणे मावळ भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर हळूहळू संपूर्ण कामशेतचा उपनगर न्हाऊन निघाला.

नाणे मावळातील कांब्रे ना. मा., नाणे, गोवित्री या भागामध्ये पाऊस पडला असला तरी कामशेत मुख्य शहरामध्ये पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. नाणे मावळ भागात अचानक आलेल्या पावसाने झाडांची पडझड झाली. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.