अमानुष मारहाण करणाऱ्या त्या महिलेवर गुन्हा दाखल

नाशिक;अमानुषपणे मारहाण करणाऱ्या त्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे,जातिवादातुन नाही तर दोन्ही एकाच समाजाचे असल्याचे सांगितले असून ते एकमेकांचे नातेवाईक असुन पैसे वसूल करण्यासाठी अत्यंत अमानवीय पद्धतीने मारहाण केल्याचा सदर विडिओ वायरल झाला होता.नांदगाव तालुक्यातील पिंपराळे गावातील ही घटना असुन महाराष्ट्र क्राईम वॉचने संबंधित घटनेचा विषय उचलून धरला होता.मारहाण करणारी महिला ही ऊस तोड कामगार मुकादम असून मार खाणाऱ्या महिलेने मुकादम महिलेकडून ॲडव्हान्स पैसे घेऊन दुसरीकडे काम केले या कारणातून ही मारहाण झालेली आहे. संदर्भामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक व नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना व्हायरल व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तातडीने वेगवेगळ्या टीम तयार करून सदर फिर्यादी व मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. शोध घेण्यासाठी ते नगर जिल्ह्यात पर्यंत गेले होते.आढळून आल्यानंतर सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषी महिलेला अटक केलेले आहे.

दोन्ही महिला एकाच समाजाच्या व एकमेकांच्या नातेवाईक आहेत. ही घटना अतिशय निंदनीय असल्यामुळे नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व पोलीस निरीक्षक कातकाडे साहेब यांनी याप्रकरणी संवेदनशील रहात कठोर कारवाई करण्याबाबत भूमिका घेतलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.