“खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं”, भाई जगतापांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भाजपचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.

भाई जगताप यांनी “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती त्यांच्या पत्नी काम करतात त्याच बँकेत कशी वर्ग झाली?” असा सवाल केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी तिखट शब्दांमध्ये ट्वीट करत भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच, भाई जगताप यांचा ट्वीटमध्ये एकेरी उल्लेख देखील करण्यात आला होता. त्यावर आता भाई जगताप यांनी खोचक शब्दांमध्ये पलटवार केला आहे. “सत्य जरा जास्त टोचतं”, असं भाई जगताप म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अमृता फडणवीसांचा उल्लेख केला होता. “माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं”, असं भाई जगताप म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांचा चांगलाच तिळपापड झाल्याचं त्यांनी केलेल्या ट्वीटवरून दिसून आलं होतं.

 

देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण काय?

अ‍ॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.