चाकण एसीपी कार्यालय, चऱ्होली पोलीस चौकीचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड : सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) चाकण विभाग कार्यालय आणि च-होली पोलीस चौकीचे मंगळवारी (दि. 23) पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बांधकाम व्यावसायिक राजेंद्र लुंकड यांनी एसीपी कार्यालय आणि पोलीस चौकीचे बांधकाम करून दिले आहे.

यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, मे. आर. के. लुंकड बिल्डर्स अँड प्रमोटर्सचे राजेंद्र लुंकड आदी उपस्थित होते.

चोविसावाडी येथे हे कार्यालय आणि चौकी सुरू करण्यात आली आहे. राजेंद्र लुंकड यांनी विना मोबदला एसीपी कार्यालय आणि पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकाम करून दिले आहे. च-होली परिसरात अधिक सक्रिय पोलिसिंग करण्यास या चौकीची मदत होणार आहे.

दिघी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही चौकी येत असून च-होली, चोविसावाडी येथील नागरिकांना या पोलीस चौकीचा उपयोग होईल. तसेच पोलिसांचा जलद ऍक्सेस मिळेल, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.