डिकसळमध्ये विकासकामाचा खेळखंडोबा ! येथील व्यायाम शाळा वादाच्या भोवऱ्यात

 

भिगवण (नारायण मोरे) :डिकसळ ता.( इंदापूर ) येथे सन २०१९ – २०२० या कालावधीत तत्कालीन पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या निधीतुन कुस्ती आखाडा अंदाजे रक्कम पाच लाख तसेच तरुणांना व्यायामासाठी व्यायाम शाळा अंदाजे रक्कम पाच लाख हा निधी मंजुर करण्यात आला होता त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेकडुन हा निधी ग्रामपंचायतकडे तात्काळ वर्ग करण्यात आला होता प्रोटोकॉल नुसार ज्या खात्यातून हा निधी आला त्या खात्याच्या पदाधिकाऱ्यांना बोलवुन त्या कामाच्या माहितीचा फलक लावुन त्यांच्या हस्ते शुभारंभ करणे बंधन कारक असते परंतु तसे न करता परस्पर ग्रामपंचायतने कुस्ती आखाड्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि येथुनच खरी वादाची ठिणगी पडली डिकसळ ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या विचाराची ग्रामपंचायत म्हणुन ओळखली जाते. प्रत्यक्षात मात्र येते राष्ट्रवादीच्या विचारातुन विकास कामाला मान्यता मिळाली होती त्यानुसार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याना बोलवुन कामाची सुरुवात करावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती परंतु सरपंच यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता सदर कामाचे भुमिपुजन केले यातूनच सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात मतभेद निर्माण झाले.

हा वाद इथेच थांबला नाही तर सदर व्यायाम शाळा कोठे बांधायची यावरून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात एकमत झाले नाही अखेर सरपंचांनी सदर विषय मासिक मिटिंगमध्ये घेऊन व्यायाम शाळा ओपन प्लेस मध्ये बांधण्याचे निश्चित करून सदर कार्यक्रमाचा नारळ फोडुन शुभारंभ केला असे असताना प्रत्यक्षात कामाला सुरुवात न करता सदर कामाचे ठिकाण बदलुन पुणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेच्या जागेत वॉल कंपाऊंडच्या आत व्यायाम शाळा बांधण्याचे निश्चित करून दुसऱ्यांदा या कामाचा नारळ फोडण्यात आला सदर कामासाठी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भादेकर यांनी विरोध करून शाळेची जागा व्यायाम शाळेसाठी न वापरता ओपन प्लेस मध्ये म्हणजे पुर्वी जिथे नारळ पडला होता तिथे बांधावी असा आग्रह धरला सदर विषय ग्रामसभेत घेतला असता सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक ग्रामसभेतुन पळुन गेले असा आरोप सोमनाथ भादेकर यांनी केला आहे तसेच याबद्दल माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग असल्याचे सोमनाथ भादेकर यांनी सांगितले याबद्दल ग्रामसेवक डी .पी.परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असतात आणि त्यांनी ग्रामसभा संपली असे जाहीर केल्यानंतरच आम्ही ग्रामसभेतुन निघुन गेलो आहे माझ्यावरील आरोप निराधार असुन मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे
याबाबत सरपंच सुर्यकांत सवाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की विषय पत्रावर जेवढे विषय होते ते सर्व विषय संपल्यावर मी सभा संपल्याचे जाहीर केले व्यायाम शाळेचे बांधकाम ज्या ठिकाणी चालु आहे त्या ठिकाणचा ग्रामपंचायत मासिक मीटिंगचा ठराव मी घेतला असुन सगळे काम नियमानुसारच चालु असुन विरोधक मुद्दाम विकास कामात अडथळा आणत आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन सोमनाथ भादेकर यांच्या म्हणण्यानुसार व्यायाम शाळेचे काम होण्यासाठी माझा विरोध नसुन विकास कामासाठी माझं कायम सहकार्य आहे परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जागा व्यायाम शाळेसाठी न वापरता ओपन प्लेस मध्ये व्यायाम शाळेचे बांधकाम व्हावे यासाठी माझा लढा कायम चालु ठेवणार असुन प्रसंगी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एकंदरीत डिकसळमध्ये विकास कामाचा खेळखंडोबा झाला असुन ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.