लाचेची मागणी करणाऱ्या डॉक्टरसह दोघांना एसीबीने पकडले रंगेहात,मावळातील धक्कादायक प्रकार
मावळ : रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत औषधोपचार पूर्णपणे मोफत असतानासुद्धाा रुग्णावर उपचार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून 9 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी एका खासगी डॉक्टरसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये मंगळवारी (दि. २३) ही कारवाई झाली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय 58), हॉस्पिटलमधील खाजगी मार्केटिंग ऑफिसर प्रमोद वसंत निकम (वय 45) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 33 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.
पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जात असताना डॉ. सत्यजित यांनी तक्रारदाराच्या वडिलांचे डायलेसिस करण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली.तडजोडीअंती 9 हजार रुपये लाच घेण्याचे ठरले. ती लाच डॉ. वाढोकर याने आरोपी खाजगी एजंट प्रमोद निकम याला घेण्यास सांगितले. एसीबीने प्रमोद निकम याला लाच घेताना मंगळवारी (दि. 23) रंगेहाथ पकडले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!