मित्राच्या त्रासाला कंटाळून महापालिकेच्या कर्मचार्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : मित्राच्या त्रासाला कंटाळून पालिकेच्या गाडीखाना रुग्णालयाच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आरोग्य केंद्राच्या पहिल्या मजल्यावर या कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन जीवन संपवलं.
विजयानंद त्र्यंबक तांदळे (वय ५६) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय तांदळे हे मंडई येथील गाडीखाना एचआयव्ही विभागात नोकरीस होते.तांदळे हे आज नेहमीप्रमाणे कामावर आले होते. याच काळात त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
“तांदळे यांनी ऑफिसच्या छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना पावणे अकराच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी तांदळे यांची तपासणी केली. त्यानंतर तांदळे यांना मृत घोषित केले,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी विजयानंद तांदळे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांना सापडली असून, त्यामध्ये मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं म्हटलेलं आहे. आता या सुसाईड नोट आधारे प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती खडक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!