रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राची बदनामी केली; जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप
मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बदल्यांच्या रॅकेट संदर्भात केलेल्या फोन टॅपिंगचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आज मंत्रींमंडळात झालेल्या बैठकीत परमबीर सिंह पत्र आणि रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग रेकॉर्ड याबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मन मोठं करुन आघाडी सरकारने तेव्हा रश्मी शुक्ला यांना माफ केलं. मात्र, त्यावेळी याच रश्मी शुक्ला समोर उभ्या राहून नवं बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नव्हतं.”
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या चुकीच्या परवानग्या घेतल्या. त्याचा वापर त्यांनी मंत्र्यांचे गोपनिय संवाद रेकॉर्ड करण्यासाठी केला. रश्मी शुक्ला यांनी गोपनियतेचे उल्लंघन केले आहे. असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार’
केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, देशाविरोधात होणाऱ्या घातक आणि धोकादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर केला जातो. रश्मी यांनी केलेले फोन टॅपिंग हे कायद्याला धरून नाही. ते संयुक्तीकही नाही. त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”
‘रश्मी शुक्लांनी नोकरशाहांचा विश्वासघात करुन गद्दारी केली’
“फोन टॅप करुन ठेवायचे आणि त्याचा नंतर वापर करायचा हे सर्व प्रकार रश्मी शुक्ला यांनी केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी आपल्यावरील वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात करुन गद्दारी केली आणि पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. त्यानंतर त्याला बदल्यांमधील भ्रष्टाचाराची जोड दिली. ज्यांच्या बदल्या झाल्या ती नावं इतके चिल्लर आहेत की त्यांचे फोनही कुणी घेणार नाहीत. त्यातला महादेव इंगोले कोण आहे हे तुम्ही शोधा, तो कुणाशी संबंधित आहे. हे एक षडयंत्र रचलं गेलंय,” असंही त्यांनी नमूद केलं.
रश्मी शुक्ला महाविकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राच्या मुख्य
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली बदल्या, बदल्यांच्या नावाखाली मोठं रॅकेट असं महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा मुख्य कोणी असेल तर त्या रश्मी शुक्ला आहे.”
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!