अवैध वाळुमाफीयावर वडगाव निंबाळकर पोलीसांचा छापा, आरोपींवर गुन्हा दाखल
वडगाव; कारखेल ता.बारामती जि.पुणे परिसरामध्ये ३ वाळुमाफीयावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली.आरोपी ट्रक्टरच्या सहाय्याने ओढयातील वाळु बेकायदेशीरपणे उत्खनन करून चोरी करून घेवून जात असतांना निंबाळकर पोलिसांनी छापा टाकून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
बबन हरीचंद्र चव्हाण(रा.कारखेल.ता.बारामती,जि.पुणे) राहुल बबन येडे (रा.गार,येडेवस्ती,पाटस, ता.दौड,जि.पुणे) भरत लक्ष्मण गावडे (रा.पाटस, बिरोबावाडी,ता.दौड,जि.पुणे) अशी गुन्हा दखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या परिसरात फिर्यादी पोलीस अंमलदार पोपट बाळु नाळे यांनी तिन्ही आरोपींना एल अॅन्ड.टी.कंपनीचे मशीन किंमत १०,००,०००/-रूपये व एक सोनालीका कंपनीचा निळा रंगाचा ट्रॅक्टर नंबर नसलेला किंमत ८,००,०००/-रूपये. एकुण किंमत १८,००,०००/- रूपये. वरील आरोपी हे ट्रक्टरचे सहायाने ओढयातील वाळु बेकायदेशीरपणे उत्खनन करून चोरी करून घेवून जात असतांना वडगाव निंबाळकर पोलीसांनी छापा टाकून आरोपीस अटक केले.
पुढील गुन्हयाचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!