अनिल देशमुख म्हणतात, “दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे!”
मुंबई : ‘परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत आपली चौकशी करा’, अशी मागणी वर्षावरील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. माझी चौकशी करा, “दूध का दूध, पानी का पानी” होऊन जाऊ दे, असे देशमुख यांनी ट्विट करताना म्हटले आहे. दरम्यान, चौकशीसाठी आता राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे, अशी माहिती स्वत: गृहमंत्री देशमुख यांनी दिली. निवारी परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आरोप केल्यानंतरही अनिल देशमुख यांनी ही मागणी केलेली. अखेर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय झाला.
निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी
परमबीर सिंग यांनी यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे वादळ उठलं होतं. ते वादळ अजूनही घोंघावत आहे. भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांना क्लीन चिट देत चौकशीची किंवा राजीनाम्याचीही गरज नसल्याचं सांगितलं. पण काल (२४ मार्च) रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे.
‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे!’
राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केलं. “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते”, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
सत्यमेव जयते… pic.twitter.com/f2oJjFhO8A— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!