जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला अटक

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी जिल्ह्याच्या हद्दीत कुठल्याही परवानगी शिवाय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

सागर दत्ता चांदणे (वय 21, रा. खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय तेलेवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी सागर याला 2 डिसेंबर 2020 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही आरोपी सागर शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला.  याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.