तळेगाव ढमढेरेत दोन मुलींसह विहिरीत उडी मारून पित्याची आत्महत्या
पुणे : दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनाा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर गावकऱ्यांना धक्का बसला आहे. वडील राजेंद्र भुजबळ , दीक्षा भुजबळ आणि ऋतुजा भुजबळ असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भुजबळ हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासमवेत वानवडी येथे वास्तव्य करीत होते .परंतु ते 23 तारखेला पत्नीला वानवडी येथे ठेवून आपल्या आपल्या दीक्षा आणि ऋतुजा या दोन मुलींना घेऊन तळेगाव ढमढेरे येथे आले होते. ते 23 तारखेपासून गायब होते.
दरम्यान, सायंकाळी गावातील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला राजेंद्र भुजबळ व त्यांच्या मुलींच्या चपला, मोबाईल पैसे पडल्याचे उत्तम यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ यासंदर्भात शिक्रापूर पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत या तिघांचा शोध सुरू केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून याबाबत आता शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!