पिंपरी चिंचवडमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने रम्मी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 13 जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) थेरगाव गावठाणात मारुती मंदिराच्या समोर करण्यात आली.
उमेश विठ्ठल बारणे, रामराम नामदेव जाधव, अनिल नथ्थू पवार, चंद्रकांत श्रीपती पिसाळे, गोविंद दत्तूबा गुजर, अरुण सीताराम बारणे, विजय दासा झेंडे, विकास बिभीषण जगताप, सुनील बारणे, सतीश भगवान गवारी, बाळासाहेब तुकाराम बणगे, मोहन मुरलीधर होळकर, वजीर मेहबूब सौदागर (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव गावठाण येथे मारुती मंदिरासमोर पारावर काहीजण पैसे लावून रम्मी नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करून 13 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या कारवाईमध्ये 51 हजार 800 रुपये रोख रक्कम आणि 240 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 52 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, संदीप गवारी, नितीन लोंढे, महेश बारकुले, मारुती करचुंडे, विष्णु भारती, गणेश कारोटे, अनिल महाजन, संगिता जाधव, मारोतराव जाधव, सोनाली माने यांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!