रात्री शतपावलीला करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले
पिंपरी चिंचवड :जेवण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री पिंपरी मधील मासुळकर कॉलनी ते नेहरूनगर या रस्त्यावर घडली.
नंदिनी बाबासाहेब शिर्के (वय 47, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिर्के मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करत होत्या. मासुळकर कॉलनी ते नेहरूनगर रस्त्यावर शतपावली करत असताना रात्री नऊ वाजताच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवरून दोघेजण आले. त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 18 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!