श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

श्रीनगर : सीआरपीएफच्या पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाल्याचे समजते आहे. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनगरमधील लवापोरा भागात गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, या हल्ल्यात सीआरपीएफचे एक जवान शहीद झाला आणि तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हा हल्ला सीआरपीएफच्या ७३ व्या बटालियनवर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील लवापोरा भागात सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला होता. लश्कर ए तैयबा या दहशतावादी संघटनेने हा हल्ला केला असल्याचे, विजय कुमार यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराचा घेराव केला आहे. तसेच या हल्ल्यातील दहतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबविली जात आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.