दहनस्टॅन्ड चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कामशेत;साते गावच्या हद्दीतील स्मशानभूमीतील १२ हजार रुपये किंमतीच्या लोखंडी मृतदेह दहन स्टॅन्ड चोरणाऱ्या चोरट्याला वडगाव पोलिसांनी मोठ्या शीताफिने मंगळवारी रंगेहात अटक केले आहे.
मावळ न्यायालयाने आरोपीला गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. विशाल अंकुश मराठे (वय ३०, रा. वराळे, ता. मावळ जि. पुणे) असे कोठडीत असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, साते व जांभूळ परिसरात स्मशानभूमीतील लोखंडी मृतदेह दहन स्टॅन्ड चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. आरोपी विशाल मराठे हा त्याची दुचाकी (एम एच १४ ए क्यु ९०४३) घेऊन साते स्मशानभूमीतील मृतदेह दहन स्टँन्डच्या ४० किलो वजनाच्या तीन लोखंडी प्लेट व प्लेटांचे तुकडे चोरुन घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहात आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वडगाव पोलिसांनी आरोपी मराठे याला मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी मंगळवारी (दि.२३) दुपारी २:३० वा. आरोपीला गुरुवार (दि.२५) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी रवींद्र राय करत आहेत. या आरोपी कडून अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षकांचा संशय आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!