निष्पाप वासरांचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कसायांना कोणी दिला?

नगर;मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्या नगर येथील सहकाऱ्यांनी पोलिसांना कळविले की टेम्पो नं mh.04.kf.0882 मध्ये गाय आणि बैल कापून बीफ ची अवैध वाहतूक होत आहे. आणि दिशाभूल करण्यासाठी बाहेरून भाजीचे करेट व भुस्याची पोती लावलेली आहेत. त्यामुळे आळेफाटा पोलीस आणि गोरक्षक, आळेफाटा चौकात अत्यंत सतर्कतेने नागरकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे लक्ष ठेवले. त्यावेली टेम्पो नं MH 04 KF 0882 याला थांबून चौकशी केली असता ड्रायव्हर ने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदर टेम्पो पो स्टे येथे आणला आणि भाजीचे करेट आणि भुस्याची पोती खाली उतरवून पाहणी केली असता. धक्कादायक दृश्य दिसले एका मोठ्या पत्र्याच्या डब्यामध्ये काळ्या रंगाच्या तडपत्रीमध्ये गायी आणि बैल यांची मुंडकी आणि पाय व कातडी काढलेल्या अवस्थेत धड आढळून आले. हे दृश्य संतापजनक होते. पोलिसांनी टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. आणि कायदेशीर कारवाई पूर्ण करून अंदाजे २ टन गोमांस डिसपोज केले.

यावेळी असे आढळले नुकतीच जन्मलेली दोन किंवा तीन दिवस ज्यांचं वय असेल असे २५ ते ३० लहान वासरे यानिर्दयी लोकांनी कापली होती. आशा निष्पाप वासरांचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कसायांना कोणी दिला?

पोलिसांना विनंती आहे या दुष्ट निर्दयी आणि अत्याचारी गोत्सकरणा गोतसआयुष्यभर लक्षात राहील अशी कठोर शिक्षा द्या.

कायद्याची पायमल्ली करणारे कसाई केवळ जनावरांची हत्त्या करून थांबत नाहीत तर कालांतराने ते अट्टल गुन्हेगार बनतात. आणि समाजाला नेहमी उपद्रव करतात. ही बाब मा. पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावी. जनावरांचा जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या कासायांना धडा शिवकविण्याचे नवे धोरण पोलीस अधिकाऱ्यांनी राबवावे आणि गोहत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करावा. ही कळकळीची विनंती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.