पिंपरी चिंचवडमधील ११ सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी केले तडीपार

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील 11 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी एकाच दिवशी तडीपार केले आहे.भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, चाकण, आळंदी, दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, चिंचवड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हेगाराचा समावेश आहे.या गुन्हेगारांना 26 मार्च 2021 पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे

 

मागील वर्षी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 72 गुन्हेगारांना तडीपार केले होते. कारवाईची मोहीम यावर्षी देखील सुरु असून यापूर्वी 13 तर आज (शुक्रवारी, दि. 26) आणखी 11 गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

भोसरी पोलीस ठाण्यातील शकील कासीम शेख (वय 24, रा. कासारवाडी), अमोल शांताराम नितोने (वय 20, रा. भोसरी), रवींद्र उर्फ गोट्या बन्सीलाल भालेराव (वय 22, रा. भोसरी), चाकण पोलीस ठाण्यातील ओंकार मछिंद्र झगडे (वय 24, रा. चाकण), रोहन महेंद्र धोगरे (वय 22, रा. चाकण), आळंदी पोलीस ठाण्यातील गौरव धर्मराज भूमकर (वय 23, रा. चिंबळी, ता खेड), दिगंबर उर्फ डिग्या विठ्ठल कदम (वय 30, रा. आळंदी), दिघी पोलीस ठाण्यातील राहुल एकनाथ धनवडे (वय 21, रा. च-होली बु.), महेंद्र रवींद्र वाघमारे (वय 45, रा. बोपखेल), चिंचवड पोलीस ठाण्यातील वीरेंद्र उर्फ बेन्द्या भोलेनाथ सोनी (वय 20, रा. वाल्हेकरवाडी), एमआयडीसी भोसरी मधील एक आरोपी अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.’

मागील वर्षी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 72 गुन्हेगारांना तडीपार केले होते. कारवाईची मोहीम यावर्षी देखील सुरु असून यापूर्वी 13 तर आज (शुक्रवारी, दि. 26) आणखी 11 गुन्हेगारांना तडीपार केले आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यावर्षी आतापर्यंत 24 गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

सन 2021 मध्ये मोक्का अंतर्गत सात गुन्हेगारी टोळ्यांमधील 47 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. आणखी तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील 32 गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. चालू वर्षात आतापर्यंत तडीपार व मोक्काअंतर्गत 103 सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.