मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तिघांना अटक

पिंपरी चिंचवड :  मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी मॉलमधील स्पा सेंटरवर छापा मारला. यावेळी एक महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशीतून या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई स्पाईन सिटी मॉल, मोशी प्राधिकरण येथे बुधवारी (दि. 24) सायंकाळी करण्यात आली.

अशोक गोविंद सपकाळ (वय 60, रा. दिघी), दीपाली पंकज तेली (वय 37, रा. मोशी प्राधिकरण), राजपाल श्रीलालसिंग यादव (वय 39, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुबराव भीमराव गवारे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी प्राधिकरण येथे स्पाईन सिटी मॉल येथे क्रिस्टल स्पा मसाज सेंटरमध्ये आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यावेळी आरोपी काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.