राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात केलं दाखल
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज(शुक्रवार) सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लष्कराच्या रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांची रुटीन तपासणी करण्यात आली आहे.’
सैन्य रुग्णालयाने वैद्यकीय बुलेटिन जारी करत म्हटलं आहे की, ‘भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना छातीत दुखत असल्याने त्यांना आज सकाळी नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात आणले गेले आहे. त्याची नियमित तपासणी केली गेली व त्यांची प्रकृती स्थिर आहे.’
सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. लवकर याबाबतची आणखी माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
President Ram Nath Kovind visited Army Hospital (R&R) following chest discomfort this morning. He is undergoing routine check-up and is under observation. His condition is stable: Army Hospital (R&R)
(file photo) pic.twitter.com/A5hfrA3HXW
— ANI (@ANI) March 26, 2021
राष्ट्रपती दोन दिवसांच्या हरिद्वार दौऱ्यावर जाणार होते, पतंजली योगपीठाचा जो पदवीदान समारंभ आहे, यामध्ये राष्ट्रपती सहभागी होणार होते. मात्र मध्येच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा हा दौरा रद्द करावा लागलेला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 3 मार्च रोजी सैन्य रुग्णालयातच कोरोना लसीचा पहिली डोस घेतला होता. राष्ट्रपती आपल्या मुलीसह सैन्य रुग्णालयात पोहोचले होते आणि तेथे त्यांनी लस घेतली. यानंतर त्यांनी लसीकरण मोहीम यशस्वीपणे देशभर राबविल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेविकांचे आभार मानले आणि इतर लोकांनाही लसी घेण्यासाठी आवाहन केले होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!