शिवसेना वेल्हे तालुकाच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांचा सत्कार…

 

पुणे प्रतिनिधी :शिवसेना वेल्हे तालुकाच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी बारामती लोकसभा सहसंपर्क प्रमुख सत्यवान उभे,जिल्हा प्रमुख रमेश बाप्पू कोंडे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदरे, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ,जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे
आणि तालुका प्रमुख शैलेश वालगुडे या आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आताच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांच्या हातूनच गावचा विकास होणार असल्यानें त्यांचे मनोबल वाढून भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.

वांगणी गावच्या विकास निधीसाठी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बाप्पू चोरघे यांच्यावतीने मागणी करण्यांत आली.यावेळी कैलास नाना चोरघे, बाप्पू तात्या चोरघे ,केशव चोरघे ,दत्ता गंगावणे, सुयोग्य ननावरे ,आणि लोकेश चोरघे उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.