२१ वर्षीय तरुणीची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या, औरंगाबाद मधील घटना

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील एकविस वर्षीय तरुणीने गावालगत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.२६) पहाटे चार वाजेच्या सुमारास पाचोड खुर्द (ता. पैठण) येथे घडली

मनिषा शिवाजी वाघ (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा वाघ ही  बीड येथील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. ऍग्रीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. ती खुप हुशार व शांत स्वभावाची असल्याने तिच्या आई – वडीलांसह काका तिला शिक्षण दिले. शिकण्याची इच्छा असल्याने कोणतीही अडचण न दाखविता स्वतः दुसऱ्यांकडे रोजंदारी करुन तिला पैसे पुरवून तिचे शिक्षण चालु ठेवले. मनीषाचे वडील टॅक्सीचालक असून बिकट परिस्थितीतही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवले. परंतु यंदा कोरोनामुळे शिक्षण कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सुरू असल्याने काही अंशी गोंधळली होती. बीड शहरात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने तेथील जिल्हाप्रशासनाकडून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने ती चार दिवसापूर्वीच गावी पाचोडला आई वडीलांकडे आली होती.

गुरूवारी(ता.२५) रात्री कुंटुबातील सर्व सदस्यजेवण वैगरे करून झोपी गेले होते. परंतु पहाटे मनीषा घरात न दिसल्याने आई -वडीलाने एवढया रात्री ती कोठे गेली म्हणून तिचा शोध घेतला. परंतु ती आजुबाजूला दिसून आली नाही. कुंटूबियासह ग्रामस्थ व अन्य नातेवाईकांनी तिचा शोध सुरु ठेवला. पहाटे गावालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पडित विहिरीकडे जाऊन पाहिले असता मनीषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने दिसून आले, उपस्थितानी तातडीने या घटनेची माहीती पाचोड पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार किशोर शिंदे, सुधाकर मोहीते आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या मदतीने मनीषाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात येऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा खरात यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहीते करत आहेत. अद्यापपर्यंत मनीषाच्या आत्महत्येविषयीचे कारण समजु शकले नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.