1 किंवा 2 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय ; अजित पवारांचं पुणेकरांना 8 दिवसांचं अल्टीमेटम

पुणे :  पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे 1 तारखेपासून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांनी सर्व कार्यक्रम खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. तर, 1 किंवा 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. सात दिवसांतील रुग्णसंख्या पाहून नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री पवार यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले,मी सर्वांशी चर्चा केली आहे. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर 1 किंवा 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही. मी याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. सगळे निर्णय एकमताने घेतले आहेत. पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवणार आहे.पुण्यात 50 टक्के बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी कार्यक्रम सर्वच पक्षांनी बंद केले पाहिजेत.

मागीलवर्षीपेक्षा जास्त पटीने रुग्णवाढत आहेत. 25 टक्क्यांचे पॉझिटीव्हीचे प्रमाण आहे. लग्नाला 50 पेक्षा जास्त संख्या ठेवायची नाही. 20 लोकांमध्ये अत्यंविधी करावा. शाळा, महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

सार्वजनिक उद्याने, बागबगीचे सकाळी चालू राहतील. मॉल, मार्केट, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवली जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक बस सेवा सुरु ठेवली जाणार आहे. नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर 1 एप्रिलपासून सुरु केली जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

लसीकरण केंद्राची संख्या दुप्पट करणार

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता सध्या 50 टक्के खाजगी रुग्णालयाचे बेड ताब्यात घेतले आहे. परिस्थिती गंभीर असून आता नाईलाजास्ताव कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्र  दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण केंद्राची संख्या 300  वरून 600 वर करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केली आहे. प्रकाश जावडेकरांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

लॉकडाऊन केला तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे  आवाहन अजित पवार यांनी या वेळी केले आहे.

पुण्यातील गेल्या 4 दिवसातील रुग्णवाढ –

  • 21 मार्च – 2 हजार 900 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू, 8 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 22 मार्च – 2 हजार 342 नवे रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू, 2 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 23 मार्च – 3 हजार 98 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू, 9 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 24 मार्च – 3 हजार 509 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू, 9 रुग्ण पुण्याबाहेरील.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.