“अजुन किती फेकणार मोदीजी? हद्द झाली राव…!”, मोदींच्या बांगलादेशच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा बोचरा टोला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. काल (२६ मार्च) बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी गेले आहेत.त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा आहे. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असं सांगितलं. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर मोदींना अजून किती फेकणार असं विचारलं आहे

नाना पटोले यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी”.

 

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

“मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.