‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’ – रुपाली चाकणकर

पुणे : मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल (२५ मार्च) सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.

यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, नवनीत राणांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता, असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून दीपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून दीपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

दीपाली चव्हाण यांनी पत्रात काय म्हटलं आहे?

साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे 3 गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात.

मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले.

जेव्हा गावकरी माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अॅट्रोसिटी लावतो. चार महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे.

या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिंग ऐकवली आहे. अ‍ॅट्रॉसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शीफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही, असे दीपाली चव्हाण यांनी चिठ्ठीत म्हटले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.