फॅशन स्ट्रीटला भीषण आग,तब्बल ८०० दुकानं आगीच्या कचाट्यात

पुणे; पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. रात्रीच्या १२ च्या सुमारास ही भीषण आग लागली असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल ८०० दुकानं आगीमध्ये जळून उध्वस्त झाली. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेनंतर तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागले.फॅशन स्ट्रीटच्या सभोवताली, मोती बिल्डिंग, एम जी रोडवरील घरं, शहजहानंद अपार्टमेंट, समृद्दी अपार्टमेंट येथे मोठी लोकवस्ती आहे. त्यांनादेखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बसल्या.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.