पोहण्यासाठी घेतली विहीरीत उडी,९ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

सांगली;सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील हजारे मळ्यातील चैतन्य सचिन वायदंडे या चौथीत शिकणाऱ्या मुलाने आपल्या वडीलांकडे पोहायला शिकवण्यासाठी तगादा लावला वडील हे सुतगिरणीत कामगार असल्यामुळे सुट्टी नव्हती .रात्रपाळी लागल्यानंतर पोहायला शिकवू असं चैतन्यला वडीलांनी सांगितलं परंतु चैतन्य जवळच्याच विहीरीत पोहण्यासाठी उतरला तो बुडतोय हे लक्षात येताच इतर मुलांनी आरडाओरडा केला जवळच्या काही लोकांनी लगेच विहीरीत उतरून त्याला बाहेर काढल आणि जवळच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केल परंतु तत्पुर्वीच चैतन्यचा मृत्यू झाला होता.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.