ग्रामपंचायत प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज – सरपंच रुपेश गायकवाड

कामशेत;मावळ तालुका व कामशेत ला मागील काही दिवसात कोरोनाने वेढा घातला आहे. कामशेत मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वाढता प्रादुर्भाव रोखणे आता नाईलाजाचे झाले आहे. त्याचीच खबरदारी म्हणून कामशेत ग्रामपंचायत आता सज्ज झाली आहे.

कामशेत शहर कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती कामशेतचे सरपंच रुपेश गायकवाड यांनी दिली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून केंद्र सरकारने नेमून दिलेल्या प्रतिबंधक सूचनेचे पालन करावे असे आवाहन सरपंच रुपेश गायकवाड यांनी केले आहे

विविध भागात फिरून मास्क, सॅनिटाईझर व फिजिकल डिस्टन्स चे पालन करणे गरजेचे आहे. अश्या सूचना देखील ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत.

कामशेत शहर कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस कर्मचारी प्रयत्नशील आहेत परंतु नागरिकांनी देखील ग्रामपंचायत व पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन सरपंचांनी यावेळी केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.