भारत-इंग्लंड वनडे मॅचवर सट्टा लावणाऱ्या 33 जणांना अटक, 33 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : शुक्रवारच्या गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत – इंग्लंड एकदिवसीय सामन्याच्या वेळी सट्टा लावणाऱ्या विविध राज्यांतील 33 जणांना तीन ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच सट्टा लावण्यासाठी लागणाऱ्या लाखो रुपयांच्या साहित्यासह जवळपास 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत – इंग्लंड संघाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सट्टा लावणा-या विविध राज्यांतील 33 जणांना ताब्यात घेतले आहे. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली तीन टिम तयार करण्यात आल्या. तिन्ही टिमनी हाय राईज बिल्डिंग, एमसीए मैदानाजवळील डोंगरावर तसेच, पुण्यातील लेमन ट्री हॉटेलवर छापा मारुन 33 जणांना ताब्यात घेतले.

अटक आरोपींमध्ये मध्यप्रदेश मधील 5, हरियाणा 13, राजस्थान 2, महाराष्ट्र 11, उत्तर प्रदेश 1 आणि गोव्यातील एकजण आहे. त्यांच्या जवळून 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 1 टॅब, 8 कॅमेरे, 4 दुर्बीण एक स्पीकर आणि चार एन्डेव्हर कार असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, 1 लाख 26 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉलर, दिराम, पॉन्ड या विदेशी चलनाचा समावेश आहे‌‌.

 

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, आरोपींनी पोलिसांवर हल्ला देखील केला पण, पोलिसांनी हल्ला परतवून लावत त्यांना ताब्यात घेतले. झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत शहरात कोणतीही अवैध गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. अशी कोणतीही घटना निदर्शनास आली तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा इशारा कृष्णप्रकाश यांनी दिला‌‌.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव उपनिरीक्षक दीपक कादबाने, हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान कदम, वाकड पोलिस ठाण्याचे कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले विजय गंभीरे, विक्रम कुदळ अतिश जाधव, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, हेमंत डांगे, सागर सूर्यवंशी, श्याम बाबा, रवींद्र पवार, आकाश पांढरे, जनकसिंग गुमलड्डू अमर राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.