अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या मुलीची तिच्या आईसह आत्महत्या
नवी दिल्ली : गेल्या दोन तीन दिवसात इंटरनेट वर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत होता. यातील २२ वर्षीय मुलीने व तिच्या ४० वर्षीय आईने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील गोंडा येथे नागसेन गावात बुधवारी पहाटे घडली आहे.
फूला देवी (वय 40) आणि मुलगी खुशबू (वय 22 रा. बेलसर) अशी आत्महत्या केलेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.
गोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुजारी पासवान यांची पत्नी फूला देवी आणि मुलगी खुशबू बेलसर गावात राहतात.तर पुजारी आणि त्याचे दोन पुत्र शिवकुमार आणि गगन पंजाबच्या जालंधरमध्ये राहतात.डिसेंबर 2020 मध्ये खुशबूचे लग्न कोतवाली गावात भुलाभुलिया गावात झाले होते.
मुलगी आणि तिच्या माजी प्रियकराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुशबू व तिची आई फूला देवी दोघीही अस्वस्थ होत्या. खुशबुचा एक माजी प्रियकर सत्यम लग्नानंतरही महिलेला त्रास देत होता. 22 मार्चच्या रात्री सत्यमने आपला आणि त्या मुलीचा अश्लील व्हिडिओ सदर महिलेच्या पतीकडे पाठविला तसेच सोशल मीडियावर व्हायरल केला.
या व्हिडिओ नंतर मुलीचे नवऱ्यासोबत संबंध बिघडले आणि ती आपल्या माहेरी परतली. तिने घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली. यानंतर, ती आपल्या मुलीसह आपल्या माहेरी गेली होती. पण सत्यम सिंगने फोन करून धमक्या देत त्यांना घरी परत येण्यासाठी दबाव आणत होता. इतकेच नाही तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. आई मुलगी दबावातून घरी परतली. परंतु आई-मुलीने अस्वस्थ होऊन मंगळवारी रात्री उशिरा घरापासून काही अंतरावर शेतातील झाडावर फास घेऊन जीव दिला.सकाळी ग्रामस्थांनी दोघींचे मृतदेह पाहिले तेव्हा गावात खळबळ उडाली.
माहितीवरून पोलिस अधीक्षक शैलेशकुमार पांडे, जिल्हा अधिकारी मार्कंडेय शाही, पोलिस स्टेशन प्रभारी तारागंज, माजी ग्राम प्रधान प्रतिनिधी रंजन बाबा, चौकी प्रभारी जय हरि मिश्रा घटनास्थळी दाखल झाले. सत्यम याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी गुन्हा दाखल करत सत्यमला ताब्यात घेतले आहे. त्याची विचारपूस सध्या सुरू आहे.
सत्यम हा मुलीला मी तुझ्या पतीला आपल्या नात्याबद्दल सांगेल, असे म्हणून ब्लॅकमेल करीत होता. मुलाने तिला आपल्याबरोबर राहण्यास सांगत, व्हिडिओसह ब्लॅकमेल करणे सुरू केले. जेव्हा महिलेने नकार दिला, तेव्हा त्याने पूर्वी रेकॉर्ड केलेली व्हिडिओ क्लिप तिच्या पतीकडे पाठविली, ”असे गोंडाचे एसपी शैलेश पांडे यांनी सांगितले.
‘मॉरल महाराष्ट्र’ चे ‘मॉरल’ आवाहन
अनेकवेळा प्रेमप्रकरणातून कपल जवळीक साधतात. त्याचे काही वेळा चित्रीकरण केले जाते. मुळात एवढा खाजगी क्षण कॅमेरामध्ये कैद का करावा लागतो ? कारण तो केवळ एका परमोच्च सुखाचा अनुभव देणारा क्षण असतो. त्यामुळे कपल्समधील दोघांनी देखील हे टाळावेच.
आपण सुद्धा असे व्हिडिओ शेअर करण्याआधी विचार करायला हवा. आपल्यामुळे एखाद्याच्या जीवनावर किती मोठा परिणाम होऊ शकतो हे आपल्याला कदाचित आता समजले असेल.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!