खूनाच्या गुन्हयात पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक

पुणे : खून करुन फरार झालेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी पाच वर्षांनंतर अटक केली आहे.या आरोपीला परभणी येथून शुक्रवारी (दि.26) ताब्यात घेतले.सचिन उत्तम तावरे (वय 34, रा. काठेवाडी, बारामती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे इतर दोन साथिदारांसोबत प्रकाश देवळे यांचा खून करून फरार झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा परभणी जिल्ह्यातील काळे धानोरा याठिकाणी असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. चंदननगर पोलिसांनी टिम तयार करून सचिन तावरे याला ताब्यात घेतले. आरोपीला पकडण्यासाठी परभणी स्थानिक पोलिसांनी मदत केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.