कोयनेत बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या

कराड : साताऱ्यातील कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

संतोष बंडू कुंभार (वय- ४०, रा. देशपांडेवाडी – बोपोली, ता. पाटण) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून कोयनानगर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुंभार हे देशपांडेवाडी – बोपोली येथील रहिवाशी आहेत. संतोष हे जून २०२० मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बांधकाम विभागात लिपिक पदावर कामास सुरुवात केली होती. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कोयना येथील शासकीय निवास्थानात कुंभार कुटुंबीय सध्या वस्त्यव्यास आहे.

देशपांडेवाडी- बोपोली येथील संतोष कुंभार हे पत्नी व मुलांसह कोयनानगर येथे राहत होते. सोमवारी सांयकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

काही दिवसांपूर्वी अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस तपास करत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.