जम्मू-काश्मीरमध्ये नगरसेवकांच्या बैठकी दरम्यान दहशतवादी हल्ला, नगरसेवकासह दोन जण ठार
जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागातून दहशतवादी हल्ल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे. सोपोरमध्ये सोमवारी बीडीसी अध्यक्षा फरीदा खान यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला झाला आहे. नगरसेवकांची बैठक सुरु असताना हा हल्ला झाला असल्याचे समजते आहे. या हल्ल्यात नगरसेवकासह दोन जण ठार झाले आहेत. तसेच या हल्ल्यात फरीदा खान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर या भागात सैन्याची तैनाती करण्यात आली आहे.
या हल्ल्यात किती दहशतवादी सामील होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही आहे. दहशतवादी अजूनही याच भागात लपून बसलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जवानांनी हा परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे.
#UPDATE | One councillor & one policeman died. One councillor has been injured in Sopore militant attack: Kashmir IG Vijay Kumar
— ANI (@ANI) March 29, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या सोपोरमधील लोन बिल्डिंगमध्ये सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात BDC सदस्यांसह PSO जखमी झाले. हल्ल्यानंतर पळून जाताना दहशतवाद्यांनी काऊन्सिलरवर फायरिंग केलं. तिथे तैनात असलेल्या एका PSOने दहशतवाद्यांना प्रतुत्तर देण्याचा प्रयत्न केला पण ते दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले. त्यावेळी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.
जम्मू काश्मीरमध्ये नुकताच एक दहशतवादी हल्ला झाला होता. यात उत्तरी काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. पोलीस चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. पोलीस चौकीवर झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली होती.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!