पुणे हादरले! वाढदिवसाला बोलावून अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

पुणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडीत घडली आहे. किळसवाणा प्रकार म्हणजे या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला आणखी दोघेजण येणार असल्याचे सांगत थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तीने विरोध करत निघून जात असताना तिच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. गोळीबाराने हा सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर, चौकशीत 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेने पोलीस दलासह शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या 16 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार अपहरण, बलात्कार तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी यातील 5 जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी जनता वसाहत परिसरात राहते. दरम्यान, गेल्या आठवड्यात फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला पॅडी याने वाढदिवसाच्या न्रिमित्ताने १५ दिवसांपूर्वी वारजे माळवाडी येथील एसआरए बिल्डिंगमधील श्रीकांत काळे याच्या रुमवर नेले होते. तिथे कृष्णा ओव्हाळ व पॅडी यांनी फिर्यादीवर बलात्कार केला. त्यानंतर निरंजन व दशरथ या मित्रांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहे, असे सांगून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. तिने या आरोपींना नकार दिला आणि घरी जाण्यास निघाली. यावेळी तिने मोबाईल छातीजवळ ठेवला. तसेच निघाली. यावेळी आरोपींने पोट माळ्यावर ठेवलेले बंदूक काढली व तिच्यावर गोळी झाडली. गोळी तिच्या छातीत लागली.  सुदैवाने तिच्या छातीजवळ मोबाईलवर गोळी लागल्याने तिला किरकोळ जखम झाली. त्यावेळी कृष्णाने चुकून हा प्रकार घडला आहे. याबात तू कोणाला सांगितले तर तुला खरोखरच मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर ही मुलगी घरी आली. खाली पडल्याने लागल्याचे तिने घरी सांगितले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता.

गुन्हे शाखेच्या पथकामुळे घटनेला फुटली वाचा

आरोपी श्रीकांत राजेंद्र काळे (वय 23, रा. एस आर ए म्हाडा बिल्डिंग, वारजे माळवाडी) धनकवडी स्मशानभूमीजवळ पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाला मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला 27 मार्च रोजी पकडले. त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व 3 काडतुसे जप्त केली. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी करत असताना जप्त केलेल्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याची चौकशी करीत असताना हा प्रकार समोर आला आहे. काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.