पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्याच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले आहे.सध्या पवारांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.३१ मार्चला त्यांची एन्डोस्कोपी झाल्यानंतर पवार यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.त्यामुळे या दरम्यान पवारांचे सर्व कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहेत.
Kind attention
Our party president Sharad Pawar saheb was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening and was therefore taken to Breach Candy Hospital for a check up.
Upon diagnosis it came to light that he has a problem in his Gall Bladder.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021
सर्व कार्यक्रम रद्द
शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित करण्यात आले होतो. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत
पवारांची प्रकृती स्थिर
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पवारांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. पवारांना नेमकं काय झालं हे मलाही माहीत नाही. मलिक यांचं ट्विट वाचल्यानंतर मला कळालं असून मी पवार कुटुंबीयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!