बेकायदेशीरपणे दारू व बिअरची विक्री करणाऱ्या हॉटेलवर तसेच हॉटेल जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसाचा छापा

पिंपरी चिंचवड : हॉटेलमध्ये त्याने बेकायदेशीरपणे दारू व बिअरची विक्री करणाऱ्या तसेच हॉटेल जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीसांनी छापा टाकून हॉटेल मालकासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा मटका अड्डा हॉटेल मालक चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी खेड तालुक्यातील येलवाडी येथील हॉटेल तुळजा भवानी मटण खानावळ या  हॉटेलवर करण्यात आली.

मटका व हॉटेल चालक मालक दिनेश मच्छिंद्र बहिरट (वय 35, रा. कान्हेवाडी, पो इंदोरी, ता. खेड), मटका रायटर सुनील किसन लोखंडे (वय 49, रा. झेंडे मळा, देहूगाव), मटका रायटर शंकर अंजनया शेट्टी (वय 60, रा. देहूरोड), मटका कॅशियर भरत त्रिंबक खांडेबराड (वय 38, रा. चाकण कडाचीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश याचे येलवाडी येथे हॉटेल तुळजा भवानी मटण खानावळ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये त्याने बेकायदेशीरपणे दारू व बिअरची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली.तसेच हॉटेलच्या बाजूला एका शेडमध्ये आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार अड्डा चालवत होते. त्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 42 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.