भाजप नगरसेविकेच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलातून स्वतःवर झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी चिंचवड : वडिलांच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयतन केला.प्रसन्ना शेखर चिंचवडे (वय २१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवड गावात घडली. प्रसन्न चिंचवडे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,प्रसन्ना याने कुटुंबियासमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाजा आला. त्यामुळे घरातील लोकांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीत तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी पहाटे काळेवाडी येथील समशान भूमी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.जखमी प्रसन्न हा नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.