भिगवनच्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय: रुग्ण संतप्त

 

भिगवन (दि २९) :भिगवण शहराला शेजारील ४० गावांचा संपर्क असल्याने येथे करोना रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे भिगवण गावात देखील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा रुग्णांसाठी भिगवण येथे एकमेव असे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले असून या सेंटरमध्ये सध्या २६ रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी कोरोणा सेंटरमध्ये मात्र रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार काही रुग्णांनी केले आहे

या करोना सेंटर मधील रुग्णांच्या हॉलमध्ये सगळी कडे अस्वच्छता आहे,वेळोवेळी साफसफाई केली जात नाही, त्याचबरोबर शौचालयाची दुरावस्था झालेली आहे व वॉश बेसिन तुंबलेले आहे तसेच रुग्णांना स्वतःच स्वतःच्या खोलीची साफसफाई करावी लागत आहे अशा एक ना अनेक तक्रारी प्राप्त मिळत असून यामुळे रुग्ण व नातेवाईक संतप्त झाले आहेत. याबाबत तात्काळ योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची मागणी येथील रुग्णांनी केलेली आहे.

हे करोना हे येथील नव्याने झालेल्या ट्रामा सेंटर मध्ये झाले आहे या ट्रामा सेंटर चे अजून उदघाटन ही झाले नाही तरीही या ठिकाणी गटार तुंबणे वॉश बेसन तुटणे अश्या अनेक गोष्टी मुळे येथील झालेल्या कामा बाबत ही शंका निर्माण होत आहे

भिगवण शहराला शेजारील तीन तालुक्यातील ४० गावांचा संपर्क असल्याने या महामारीचे काळात येथील पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागावर मोठा ताण येत आहे

तसेच कोरोणा सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होणे हे रुग्णाच्या आरोग्याशी हेळसांड केल्यासारखे आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन गैरसोय दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत येथील सेंटरचे आरोग्य अधिकारी डॉ.व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असून,कर्मचारी सांगितलेले काम ऐकत नाहीत त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात कर्मचारी उपलब्ध करून रुग्णांना सर्व सोयी सुविधा दिल्या जातील.

येथील कोरोना सेंटर मधील रुग्णांची गैरसोय झाल्याचे समजताच इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी त्वरित तहसीलदार, इंदापूर व तालुका आरोग्य अधिकारी,इंदापूर याचेशी संपर्क साधून येथे होणाऱ्या अडचणी त्यांचे कानावर घालत येथील रुग्णांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.