सराईत गुन्हेगार सुनिल ठाकुर टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांची मोक्का कारवाई

पिंपरी चिंचवड :वाकडं पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुनिल विश्वनाथ ठाकुर टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली.

टोळी प्रमुख सुनिल विश्वनाथ ठाकुर (वय 23, रा.जय मल्हार नगर, थेरगांव, पुणे), विजय राहुल तलवारे (वय 19, रा. अमरदिप कॉलनी, रहाटणी, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील आणि विजय याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात जबरी दुखापत करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून सामानाची तोडफोड व नुकसान करुन दहशत माजवून नागरिकांच्या खिडकीच्या काचा फोडुन नुकसान करुन नाहक त्रास देणे, मारहाण करुन जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनी दहशत निर्माण करणे, असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यासाठी अपर पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास मान्यता देऊन सोमवारी अपर पोलीस आयुक्तांनी दोन्ही गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,आनंद भोईटे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ श्रीमती प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-२, यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा (अतिरीक्त कार्यभार), विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पी.सी.बी. गुन्हे शाखा, स.पो.फौ. सुहास पाटोळे, वाकड पोलीस
ठाणे, यांचे पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.