सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलीसांनी पकडुन  अटक केली आहे. त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त करण्यात आले आहेत.

दिपेंद्र रोदे विश्वकर्मा (वय 20), बिक्रम खगेंद्र विश्वकर्मा (वय 23), ममता लालाजी रजपूत (वय 39, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे घातक शस्त्र घेऊन लष्कर परिसरात थांबले होते. यादरम्यान नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की काहीजण सेंटर स्ट्रीट येथे थांबले आहेत. त्यानुसार नियंत्रण कक्षाने ही माहिती लष्कर पोलिसांना दिली. यानुसार पथक याठिकाणी गेले. तेथे आरोपी हे घातक शस्त्र घेऊन एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याचे दिसून आले. त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून शस्त्र साठा जप्त करण्यात आला. चौकशीत त्यांनी दरोडा टाकणार असल्याची माहिती दिली. यानंतर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.