रुग्णालयातील भ्रष्टाचार फोफावतोय,सामान्य नागरिक सुविधांपासुन वंचित
पुणे; महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत भेटणाऱ्या योजनेपासुन सामान्य नागरिक वंचित राहत असुन, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या नातलगांना शासकीय योजनेची पुरेशी माहिती न देता संपुर्ण अनुदान लाटण्याचा चंगच बहुधा रुग्णालयाने बांधलेला दिसत आहे. शासकीय योजनेअंतर्गत दाखल करुनही, योजनेसंदर्भात कोणतीही माहिती न देता रुग्णाला दाखल करण्यात येते. एखाद्या नातलगाने योजनेसंदर्भात अधिकची माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात येते.ऐका तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हा पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेनुसार रुग्ण दाखल झाला, त्यामध्ये रुग्णाला येणाऱ्या बिलाच्या ५० टक्के रक्कम ही महानगरपालिका भरणार आहे,परंतु तक्रारदाराकडुन औषधांचा खर्च हा १०० टक्के वसुल करण्यात आला संबंधित तक्रारदाराला जेव्हा सदर योजनेची माहिती समजली असता त्याने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारताच यापुढील औषधावरील बिलावर ५० टक्के करु असे सांगण्यात आले!मुळ प्रश्न असा कि रुग्णालयात भरती करताना शासकीय योजनेची माहिती का देण्यात येत नाही?सरकार कडुनही तसेच रुग्णांकडुनही संपुर्ण रक्कम वसूल करुन मोठा भ्रष्टाचार होत तर नसेल ना!
संपादक – विनायक जगताप.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!