घर घेताना फसवणुक टाळण्यासाठी हे वाचाच!

रेडीरेकनर म्हणजे नक्की काय?

एखादी व्यक्ती घर,जमीन घेण्याचा किंवा एखाद्या व्यवसायासाठी जागा घेण्याचा विचार करते तेव्हा रेडीरेकनर किती आहे हे अनेकदा विचारले जाते. कारण रेडीरेकनर वाढला तर घराचे भाव वाढतात तर रेडीरेकनर कमी झाला तर घराचे भावही कमी होतात. त्यामुळेच रेडीरेकनर ला या खरेदी विक्री मधे खुप महत्त्व आहे.

रेडीरेकनर हे घरांच्या, जमिनीच्या आणि व्यावसायिक वापरांसाठी च्या जागांचे दर असतात. हे दर प्रत्येक भागानुसार त्यातील राहणीमानानुसार बदलत असतात.

रेडीरेकनर चे दर कोण ठरवते ?
हे दर राज्य सरकार कडून ठरविले जातात,त्यात दरवर्षी बदल केला जातो. अर्थव्यवस्था, मागणी, पुरवठा यांची स्थिती पाहून हे दर ठरवले जातात.

रेडीरेकनर चे दर कशासाठी असतात?
रेडीरेकनर दर म्हणजे त्या त्या भागातील घर,जमीन,व्यावसायिक वापरासाठी ची जागा यांचे प्रमाण दर असतात. त्यानुसार खरेदी वेळी भराव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटी किंवा नोंदणीचे शुल्क आकारले जाते. पण यातही असा नियम असतो की सरकारने ठरवून दिलेल्या रेडीरेकनर दरापेक्षा कमी दरात घर,जमीन,जागा घेतली तरी सरकारीदरानुसार स्टॅम्प ड्युटी किंवा नोंदणी शुल्क आकारले जाते. पण जर घर, जमीन,जागा यांचे दर रेडीरेकनर दरापेक्षा जास्त लावले असेल तर मात्र जास्त रकमेने शुल्क आकारले जाते.

रेडीरेकनर वाढल्यास काय होते?
सरकारने रेडीरेकनरचे दर वाढवले तर घराच्या किमती वाढतात,जर रेडीरेकनरच्या घरा पेक्षा कमी किमतीत घर घेतले तर वाढीव दराने शुल्क आकारले जाते.

उदा: एखाद्या भागात घराची किंमत रेडीरेकनर नुसार २५ लाख आहे पण बिल्डर ते घर ३० लाखांना विकत असेल तर त्यावर भरली जाणारी स्टॅम्प ड्युटी ही ३० लाख रुपये नुसार द्यावी लागेल. अशाप्रकारे रेडीरेकनर आणि जमिनीची किंमत यांचा संबंध येतो.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.