घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार युनिट पाचकडून जेरबंद; 28 तोळे सोनं जप्त

पुणे :  घरफोडी करून सोलापूरला पळून जात असलेल्या सराईत गुन्हेगारास युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या जवळून 12.60 लाखांचे 28 तोळे सोनं जप्त करण्यात आले आहे.

जयवंत गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. औंध) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी जयवंत गायकवाड एक मोठी घरफोडी करुन सोलापुरला जाण्यासाठी हडपसर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.आरोपीने शिवाजीनगर परिसरात मोठी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या जवळून घरफोडीतील 12 लाख 60 हजार किंमतीचे 28 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह-आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेचे मा. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-२ चे सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस हवालदार अजय गायकवाड, पोलीस हवालदार चेतन चव्हाण, पोलीस हवालदार प्रमोद टिळेकर, पोलीस हवालदार दीपक लांडगे, पोलीस हवालदार रमेश साबळे, पोलीस नाईक दयाराम शेगर, पोलीस शिपाई संजय दळवी, महिला पोलीस शिपाई स्नेहल जाधव या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.