देहूत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत बीज सोहळा संपन्न

पिंपरी चिंचवड : देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराज बीज सोहळा मंगळवारी (दि. 30) अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. हरिनामाच्या गजरात सर्व वारक-यांनी तुकोबांना कोरोना महामारी घालवण्याचे साकडे घालून वारी पुन्हा पूर्ववत सुरु व्हावी, अशी मागणी केली.

मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत बीज सोहळा संपन्न झाला. मुख्य मंदिरात भजन आणि विठूनामाचा जयघोष करण्यात आला. दरवर्षी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने दुमदुमणारी देहूनगरी यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे अगदी ओस पडली होती. कोरोना महामारीचे संकट लवकर टळू दे, असे साकडे सर्व वारक-यांनी तुकोबांकडे घातले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बीज मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिले होते. राज्य शासनाच्या आदेशाचा मान ठेऊन वारक-यांनी बीज सोहळा घरूनच साजरा करण्याचा निर्णय घेतला.

बीजेच्या दिवशी दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, आठ पोलीस निरीक्षक, 100 पोलीस आणि राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बीज सोहळ्यासाठी देहूनगरीत तैनात होत्या.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.