अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यास कामशेत पोलिसांनी केले जेरबंद
कामशेत;कामशेत जवळील पाथरगाव हद्दीत जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यास कामशेत पोलिसांनी मोठया शीताफिने ताब्यात घेऊन जेरबंद केले.
गुरुवारी (दि.२५) रात्री दहा वाजल्याच्या सुमारास कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार समीर शेख यांना मुंबई पुणे महामार्गावरून कामशेत येथुन लोणावळ्याकडे मद्याची बेकायदा वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कावत व कामशेत चे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामचंद्र कानगुडे व दत्तात्रय शिंदे यांनी मद्याची वाहतुक करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करून मोठ्या शिताफिने टेम्पो समोर पोलीस जीप आडवी लावून सिनेस्टाईल पद्धतीने त्यास पाथरगावच्या हद्दीतील महामार्गालगतच्या एका हॉटेल समोर अडवून तीनचाकी टेम्पो (क्र.एमएच १२ आर.पी ९०३६) याची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी मद्याच्या बाटल्यांनी भरलेले २६ बॉक्स मिळुन आल्याने पोलिसांनी मद्याच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स व टेम्पो असा एकूण २ लाख ८७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच टेम्पो चालक संतोष शंकर हुंबे (वय २६, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यास ताब्यात घेऊन त्यास शुक्रवारी (दि.२६) वडगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!