रेशनकार्डासंबधित सर्व माहिती पहा एका क्लिकवर

वन नेशन वन रेशन कार्ड विषयीची संपुर्ण महिती:

वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जर तुम्ही दुसर्‍या राज्यामध्ये गेला तर तिथे ही तुम्ही रेशन घेऊ शकता अणि जर दुसर्‍या राज्यातून काही माणसं आपल्या राज्यात महाराष्ट्रात येतात तर ते सुद्धा आपल्या इथे रेशन घेऊ शकतात.

‘मेरा रेशन’ ॲप विषयीची संपुर्ण महिती:

या योजनेत एक ॲप्लिकेशन लाँच झाल आहे. त्या ॲप्लिकेशन च नाव आहे ‘मेरा रेशन’.सेंट्रल एईपीडीएस टीम ने हे ॲप्लिकेशन बनवलेल असुन १२ मार्च रोजी हे ॲप लाँच झाल आहे.या ॲप्लिकेशन मध्ये हिंदी किंवा इंग्लिश या भाषा तुम्ही निवडू शकता.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

१. होम पेज वर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पहिला ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या रेशन कार्डचा १२ अंकी नंबर टाकून सबमिट करायचं आहे.

२. सबमिट केल्यानंतर सगळे घरातले सदस्याची नाव दिसतील, तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा राज्या मध्ये येत ही संपूर्ण माहिती मिळेल. तर इथेच तुम्हाला मेंबर आयडी अणि घरातल्यांची नाव दिसतील. जर तुम्ही महाराष्ट्र राज्य सोडून दुसर्‍या राज्यात गेला अणि तुम्हाला तिथे रेशन घ्यायच असेल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला कराव लागत यालाच ONORC रजिस्ट्रेशन असं म्हणतात.

३. मायग्रेशन फ्रॉम विषयीची माहिती: जर तुम्हाला स्थलांतर करायचं असेल तर खाली असलेल्या मेंबर च्या लिस्ट मधून जे घरातले व्यक्ति स्थलांतर होणार आहे त्यांची नावे सिलेक्ट करून खाली राज्यात, डिस्ट्रिक्ट यानंतर मायग्रेशन फ्रॉम म्हणजे कोणत्या महिन्यात अणि वर्षी तुम्ही स्थलांतर होणार आहात ते सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे.

४. मोबाईल नंबर अणि मायग्रेशन चा रिमार्क या ऑप्शन वर जाऊन तुम्ही का स्थलांतर होताय त्याच कारण सिलेक्ट करून हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता.

५. दुसरा ऑप्शन आहे ‘know your entitlement’, तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे रेशन कार्ड नंबर अणि आधार कार्ड नंबर तुम्ही टाकून सबमिट करू शकता.

६. सबमिट केल्यावर तुम्हाला कोणते कोणते धान्य मिळत हे दिसेल आणि ते किती किलो मध्ये किती रुपयांच आहे, किती रुपयांनी तुम्हाला मिळत ही देखील संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. अलोटमेंट अणि बॅलेंस देखील तुम्हाला दिसतो.

७. ‘know your nearest ration shop’म्हणजे तुमचा जवळ कोणते रेशन शॉप आहे याच रजिस्ट्रेशन म्हणजे इथे ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे रेशन आहेत त्या रेशन दुकानदाराची नाव ऑनलाईन पाहू शकता.

८. इथे त्यांचा एफपीएस आयडी, डीलर नेम म्हणजेच जवळ च्या रेशन दुकानाची नावे तुम्हाला मॅप वर दिसतील. चौथा ऑप्शन आहे ONORC म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड ची योजना आहे ती कोण कोणत्या राज्यात राबवण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहू शकता.

९. ‘my transaction‘ या ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचे व्यवहार पाहू शकता.

१०.‘eligibility criteria’ या ऑप्शन मध्ये रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट करायचे आहे यात तुम्हाला रिमार्क अणि स्टेटस दिसतील यात दुसरा आणि चौथा ऑप्शन yes पाहिजे.

११.’आधार सिडींग’ या ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचा घरातल्या कोणत्या व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड शी लिंक आहे ते पाहू शकता. खाली सगळ्या मेंबर्स ची नाव अणि आधार सिडींगच स्टेटस दिसेल जर yes असेल तर काही करायची आवश्यकता नाही.जर no असेल तर तुम्हाला रेशन दुकानातून लिंक करावे लागेल.

होम स्क्रीन वर असे बरेच ऑप्शन आहेत.की जिथे तुम्ही त्या विषयाची संपूर्ण माहिती मिळवू शकता. आणि तरीही तुम्हाला या संदर्भात काही अडचणी येत असतील तर हेल्पलाइन नंबर १४४४५ ला कॉल करू शकता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.