Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी उरले फक्त एक दिवस, अन्यथा तुमचे Pan Card होणार बंद

मुंबई : सामान्य माणसांसाठी आयकर रिटर्न्स फाईल करण्याची प्रक्रिया याआधीच ऑनलाईन करण्यात आली आहे. यामागे सरकारचा हेतू होता की सरकारी कार्यालयांमधील मोठ्या रांगांपासून सामान्यांची सुटका व्हावी. याचबरोबर सरकारने आपले आधारकार्ड  आपल्या पॅनकार्डशी लिंक करणेही अनिवार्य  केले होते. याची शेवटची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पॅनकार्डलाा आधारकार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले असून 31 मार्चपर्यंत पॅनकार्डला आधारकार्ड  लिंक केलं नाही तर तुमचे पॅनकार्ड बंद पडणार आहे. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.  जाणून घ्या याबद्दल आणि आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक करण्याची प्रक्रियाही.

सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पॅन कार्ड त्यांच्या आधारला लिंक करावं लागणार आहे. तसं जर नाही केल्यास त्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.

या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. गेल्या आठवड्यात लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

1 हजार रुपये विलंब शुल्क लागू होणार

केंद्र सरकारने याआधी आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यास विलंब झाल्यास 1 हजार रुपयांचा दंड निश्चित केला होता. यासाठी लोकसभेत कलम 234H (आर्थिक विधेयक) सादर करण्यात आले होते ज्यानुसार आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक नसल्यास 1000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. हे विलंब शुल्क हे निष्क्रिय पॅनकार्ड बाळगण्याबद्दल लागणाऱ्या दंडाव्यतिरिक्त असेल.

पॅनकार्ड होणार निष्क्रीय

आयकर विभागाने याआधीच सांगितले आहे की 31 मार्च 2021पर्यंत ही दोन कागदपत्रे लिंक केली नसल्यास आपले पॅनकार्ड निष्क्रीय होईल. जिथे आपल्या बँकेत 50000पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार केले जातात तिथे पॅनकार्ड हे अनिवार्य असते. त्यामुळे जर आपण अद्याप आपले आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा.

आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया

  • पहिल्यांदा आयकर विभागाच्या ई- फायलिंग पोर्टल ला भेट द्या. लिंक ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा.  https://incometaxindiaefiling.gov.in/
  • आपले आधार आणि पॅन नंबर आणि नाव आणि पत्त्याची योग्य माहिती द्यावी.
  • दिलेली माहिती योग्य असल्यास पॅनकार्ड आधारशी लिंक होईल.
  • मेसेजच्या माध्यमातूनही पॅनशी आधार कार्ड लिंक केले जाऊ शकते.
  • कॅपिटल लेटरमध्ये UIDPN टाईप करा, त्यानंतर स्पेस देऊन आपला आधार नंबर आणि पॅन नंबर टाका.
  • हा SMS, ५६७६७८ किंवा ५६१६१ यावर पाठवावा.
  • थोड्याच वेळात तुमचा आधार नंबर पॅनशी लिंक झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.