पुण्यात इंजिनिअर तरुणाची नोकरी गेल्याने नैराश्येतून इंजिनियर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : कोरोनामुळे लॉकडाउनमुळे कंपन्यांचे काम ठप्प झाल्याने मागील वर्षभरात लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशातच पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
ऋषिकेश मारुती उमाप (वय 29, रा. कावेरी पार्क सोसायटी, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृषीकेशचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. तर त्याचा एक भाऊ बंगळूर येथे नोकरीस आहे. सध्या तो कोंढवा परिसरातील कावेरी पार्क सोसायटीमध्ये कुटुंबासोबत राहत होता. इंजिनिअर असलेला ऋषिकेशची लॉकडाउनमध्ये नोकरी गेली. त्यामुळे तो घरीच बसून होता. नोकरी नसल्याने, तो कायम चिंतेत होता.
दरम्यान, ऋषिकेश नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री त्याच्या रूममध्ये झोपण्यास गेला. मात्र सकाळी बराच वेळ होऊन देखील बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या रूममधील खिडकीतून घरातील व्यक्तीनी पाहिले असता ऋषिकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्याचा मृतदेह शवविच्छेनासाठी पाठविला आहे. खोलीत सुसाईट नोट आढळुन आलेली नाही.या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!