भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने वार ; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : मेव्हण्याच्या मित्राला मारहाण करणार्‍यांपासून सोडवून केल्याच्या रागातून तरुणावर तलवारांनी वार करुन दगडाने मारहाण करुन जबर जखमी करण्याचा प्रकार खडकीत घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बंटी ऊर्फ कपिल भोसले (रा. राजीव गांधीनगर, खडकी), मोन्या गोपनारायण, शरद तायडे, विक्रांत देवकुळे (रा. औंध रोड), सौरभ मोरे, यलिंगा ऊर्फ येल्या (रा. बोपोडी), हर्ष चांदणे (रा. राजीव गांधीनगर, खडकी), अमोल भोसले (रा. सांगवी), डोके आणि सुशिल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्ता दिलीप सोळुंके (वय २७, रा. राजीव गांधीनगर, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सोळुंके हे कुटुंबासह २९ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता रिक्षाने जात होते. यावेळी एल्फिस्टन रोडवर त्यांच्या मेव्हण्याचा मित्र अनुज गुप्ता याला मारहाण चालू होती. त्यांनी रिक्षा थांबूवन  विचारपूस केली. अनुज याला मारहाणीपासून सोडविले. त्यानंतर ते रिक्षाने घरी राजीव गांधीनगर येथील रेल्वे मार्गाजवळ आले. भांडणे सोडविल्याच्या रागातून बंटी भोसले याने इतरांना जमवून सोळुंके यांना घरासमोर अडविले. त्यांच्यावर तलवारीने वार केला. तसेच दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. खडकी पोलिसांनी ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.