वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये सराईत गुंडांकडून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन जाणार्‍या तरुणाला सराईत गुंडांनी अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करुन जबर जखमी करण्याचा प्रकार वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान चौकात हा प्रकार घडला आहे.

दाद्या मिसाळ (रा. रामनगर, वारजे), शेखर खवळे (रा. कर्वेनगर) बाळ्या येनपुरे आणि सचिन हिरेमणी (दोघे रा. रामनगर, वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी परशुराम तात्या गायकवाड (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी दुपारी  पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन मोटारसायकलवरुन घरी जात होते. यावेळी रामनगरमधील हनुमान चौकात गुंडांनी त्यांची गाडी गायकवाड यांच्या गाडीला आडवी घालून थांबायला लावले. तसेच त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून खून करण्याचाही प्रयत्न केला. भरदुपारी हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. सोडवण्यास येत असणाऱ्या नागरिकांना देखील या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवला. तर परिसरात तुफान गोंधळ घालत दहशत निर्माण केली. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.